अपंग..

  • 4.3k
  • 1
  • 1.4k

गेल्या काही वर्षात त्याच्या वयाने जरा जास्तच वेगाने टप्पे पार केले आहेत. सगळ्या घटना अशा काही घडत गेल्या की जणू वेळ अगदी कमी होता आणि घडणाऱ्या घटना खूप अधिक. त्यामुळे दोन घटनां मधलं अंतर कमी कमी होत गेलं आणि तो हतबुद्ध होऊन फक्त बघत राहिला. घडत असणाऱ्या या घटनांमध्ये मग अशा काही अघटीत गोष्टी घडल्या, की उन्मळून पडला तो. लढण्याची इच्छा, आकांक्षा, मनोबल सगळच कमी होऊ लागलं आणि त्याला हरण्याची सवय होऊ लागली. हार जणु काही त्याच्या अंगवळणीच पडली. जिंकणे हे त्याच्या परिघाच्या बाहेरच्या गोष्टीत जमा झाले. तशी सुरुवातीपासूनच खूप रंगीबेरंगी स्वप्न त्याने कधीच बघितली नव्हती, ना त्याला कधी पंख