ह्याला जीवन ऐसे नाव - भाग ७ (अंतिम )

  • 6.3k
  • 3.2k

भाग ७ भाग ६  वरुन पुढे  वाचा ..............   पंडित नी काही न बोलता त्यांच्या ऑफिस मध्ये फोन लावला. पंडितचा फोन आला म्हंटल्यांवर सर्वांनाच बोलायचं होतं. अर्धा तास सगळ्यांचं समाधान करण्यात गेल्यावर  मग पंडितनी मॅडम चा प्रॉब्लेम सांगितला  आणि क्लेम सेट्टल करता येतो का ते पहायला सांगितलं. पंडित जवळ जवळ तासभर अस्खलित इंग्रजी मध्ये अधिकारवाणीने बोलत होता आणि मॅडम त्यांच्याकडे चकित नजरेने पहात होत्या. “माझ्या मित्राला सांगितलं आहे, बघू तो काय करतो ते.  तुम्ही आता आराम करा मी आता संध्याकाळच्या तयारीला लागतो. आज काय करू ?” – पंडित.   “अरे, तू जे काही करशील ते मला आवडतंच. काहीही कर.” –