गुंजन - भाग ३०

  • 6.5k
  • 3.1k

भाग ३०. गुंजन आणि वेद आपल्या मुंबईतील त्यांच्या बंगल्यात पोहचतात. आतमध्ये बंगल्यात ते जायच्या आधी वेदची आई गुंजनला ओवाळते आणि मग घरात घेते. "गुंजन, खूप छान वाटल आम्हाला तुमचं यश पाहून. तुमचा डान्स पण चांगला होता", वेदची आई आनंदात म्हणाली. आईला पाहून गुंजन थोडीशी भावुक होते आणि त्यांना मिठी मारते. तिच्या अश्या अचानक वागण्याने त्या गोंधळून वेदकडे पाहतात. वेद डोळ्यांनीच त्यांना शांत राहायला सांगतो. तश्या त्या भानावर येऊन गुंजनच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवतात. "तुम्हाला माहित नाही आई, पण तुमच्या तोंडून कौतुक ऐकून एक वेगळीच फिलिंग वाटली. कारण माझ्या घरात कधीच माझं अस कौतुक झाले नव्हते. लहानणापासूनच मी मुलगी आहे ना