गुंजन - भाग २९

  • 6.5k
  • 3.1k

भाग २९. "गुंजनऽऽऽ", वेद अस बोलून तिला उचलून आत घेतो. आता त्याला देखील काळजी लागली होती. तो आणून बेडवर ठेवतो आणि लगेच डॉक्टरला कॉल करतो. काही वेळातच डॉक्टर रात्रीचे वेद गुंजनच्या हॉटेल रूमवर पोहचतात आणि गुंजनला चेक करायला लागतात. "कुछ ज्यादा नहीं हुआ है सर। मॅडमने आज ज्यादा प्रॅक्टिस की है ना इसलिये उन्हे चक्कर आये है।"डॉक्टर गुंजनला चेक करत म्हणाले. यावर वेद काहीही न बोलता शांत राहतो. डॉक्टर गुंजनला योग्य ते उपचार देतात आणि गोळ्या वगैरे देऊन निघुन जातात. ते गेल्यावर वेद गुंजन जवळ बसतो. तो थोडस झुकून तिच्या गालावर फिरवतो. "खूप त्रास झालं ना आता माझ्यामुळे? सॉरी सोना.