गुंजन - भाग १९

  • 7.3k
  • 3.7k

भाग १९. गुंजनचा परफॉर्मन्स तर बेस्ट झाला होता आणि तिला वन्स मोअर मिळाल्याने तिने पुन्हा एकदा सगळयांना नाचून दाखवलं होत. आपला परफॉर्मन्स संपवून ती स्टेजच्या खाली उतरते. सगळे जण तिला चेंजिंग रुमपर्यंत जाईपर्यंत हात मिळवणी करून तिला अभिनंदन करत असतात. ती देखील हसूनच सगळयांना धन्यवाद म्हणत असते. सगळयांचे आभार मानून ती रूममध्ये पोहचते आणि हसूनच पटकन आपल्या मोबाईल वरून वेदला कॉल करते. "अभिनंदन , मिसेस वेद. खूप छान डान्स होता तुमचा. ", वेद हसूनच कॉल उचलल्या उचलल्या तिला म्हणाला. त्याचा तो आवाज आणि कौतुक पाहून तिला भरून येत. "थँक्यु, मिस्टर वेद. तुम्ही आज बिझी नाही का?",गुंजन आवाजावर कंट्रोल ठेवत विचारते.