भाग १४. "गुंजन, उठा मॅडम. सकाळ झाली आहे.",वेद तिच्या गालावर स्वतःचे ओठ टेकवत प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला. मगासपासून तो असच करत होता. पण तरीही गुंजन डोळे उघडून पुन्हा डोळे बंद करत असायची. "नका ना छळू!! मला झोपू द्या तुम्ही",ती अस बोलून पुन्हा त्याच्या कुशीत शिरते. तो आता नाही मध्ये मान हलवतो. "गुंजन, अग आज दिल्ली पाहू या ना? मी तुला दिल्ली दाखवणार आहे. पण त्या नंतर मात्र , तू न घाबरता दिल्लीत वावरायचे आहे. हे दिल्ली शहर, कधी तुला आपलं करून घेईल? आणि कधी तुझ्या मनाची भीती कमी करेल? हे, तुझं तुला कळणार नाही. बघ, तू इथून निघताना