गुंजन - भाग ११

  • 8.8k
  • 4.6k

भाग ११. आजचा गुंजनचा दिल्लीमधील दुसरा दिवस होता. काल उशिरा रात्री झोपल्याने, सकाळी तिला जागच आली नाही लवकर. वेदने बरेच कॉल केले तरीही मॅडम मस्त झोपल्याने, त्यांना त्याचे कॉल ऐकू आले नाही. शेवटी, गुंजन झोपेतच मोबाईल कंटाळून उचलते. "हॅलो, कोण?मला झोपू द्या ना!"गुंजन झोपेतच बोलते. "गुंजन,सकाळचे नऊ वाजले आहे"वेद काहीसा हसून हळू आवाजात बोलतो. त्याच ते बोलणं तिला आधीतर कळत नाही. पण, नंतर कळताच ती भयंकर शॉक होते. "क...काय ? नऊ वाजले? मी एवढा वेळ झोपून कशी राहिली?अहो..तुम्ही पण मला कस झोपू दिलात?"गुंजन घाईत उठतच आपलं बडबडतच त्याच्याशी बोलायला लागते. "गुंजन, तू नेहमी एवढा वेळ झोपते. यावेळी मी नव्हतो तुला