निर्णय. - भाग १९

  • 6.5k
  • 3k

निर्णय भाग १९मागील भागावरून पुढेमेघनाच्या फोटो पत्रीका मुलाकडच्यांना देऊन दोन दिवस उलटले होते.आजच्या दिवस थांबून.ऊद्या फोन करून बघू असं इंदिरेने मनाशी ठरवलं.दिवसभर नेहमीचीच काम होती पण इंदिरेला कंटाळा आला कारण मेघनाचा फोटो मुलाला पसंत पडला असेल का? काय झालं असेल या विचारात असल्यामुळे तिला बाकी काही सुचत नव्हतं.यंत्रवत तिने संध्याकाळी बगीच्यात झाडांना पाणी घातलं. रात्रीचा स्वयंपाक केला. स्वयंपाक तो काय दोघांचा म्हणजे भातुकलीच असायची. मंगेशचे खाण्यात नखरे असायचे. इंदिरेला मात्र जेवताना भाजी प्रमाणे कोशींबीर चटणी सारखी डावी बाजू पण आवडायची. ती तिच्यासाठी तिला आवडतं ते करायची पण आज तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं.जेवताना सुद्धा ती आपल्याच तंद्रीत होती.मंगेशला समोर असलेली