बावरा मन - 14 - अश्रु....

  • 8.9k
  • 1
  • 4.2k

दोन दिवसांनी निंबाळकर परिवार जयपुर जाण्यासाठी निघाले... पहाटेची फ्लाईट असल्याने सगळे लवकर उठले होते... रिद्धी त्यांना बाय करायला उठली होती... " रिधु काळजी घे बाळा... आम्ही उद्या परत येऊ तरी देखील..." मंजिरी" आई तु नको काळजी करुस... मी घेईल स्वत:ची काळजी आता लहान नाही आहे मी... " रिद्धी त्यांना मिठी मारत बोलते... " तु कितीही मोठी हो... आमच्यासाठी लहानच आहे.." यशवंत तिच्या डोक्यावर हात ठेवत बोलले... " आई - बाबा निघूया... बच्चा काळजी घे स्वतःची आणि ऑफिसमध्ये जास्त वेळ नको थांबूस नाही तर मी नाही म्हणून कामं करत बसशील..." विराज" हो दादू... मी घेईल स्वतःची काळजी आणि लवकर घरी येईल..."