निर्णय. - भाग १४

  • 6.8k
  • 3.3k

निर्णय भाग १४निर्णय भाग १४मागील भागावरून पुढे…बघता बघता शुभांगीची पहिली मंगळागौर आली. इंदिरेला उत्साह आला. ती मंगळागौरीची तयारी करू लागली. शुभांगीसाठी सोन्याचा एखादा दागिना घ्यावा अशी तिची इच्छा होती.मंगेश याला राजी होणार नाही हे तिला माहीती होतं पण तरी तिने हा विषय मंगेश समोर काढला."अरे पूजा करा.ते सोन्याच्या दागिन्यांची काय गरज आहे? लग्नात दिले तेवढे दागीने पुरेसे नाही का?"" सुनेला पहिल्या मंगळागौरीला सोन्याचा दागीना देण्याची पद्धत आहे."" असेल पद्धत पण मला मान्य नाही."" तुम्हाला मान्य आहे की नाही हे कुठे विचारते आहे. तुम्हाला सांगतेय की अशी पद्धत आहे तेव्हा मला पैसे द्या मी सोनाराकडे जाऊन आवडेल तो दागीना घेऊन येईन.""