निर्णय - भाग १३

  • 7.1k
  • 3.5k

निर्णय भाग १३मागील भागावरून पुढे…मिहीर आणि शुभांगी दोघंही हनीमूनला गेले आणि इंदिरेला घरातील चहाळ कमी झाल्यासारखी वाटली. मेघना काही दिवस थांबणार होती कारण नुकतीच तिची परीक्षा संपल्यामुळे सध्या ती मोकळीच होती.मिहीरचं लग्नं सुरळीत पार पडेपर्यंत इंदिरेच्या मनावर ताण होता.मंगेशचा तिला भरवसा वाटत नव्हता. एवढी वर्षे त्याच्याबरोबर संसार केल्यामुळे इंदिरेला कळून चुकलं होतं की मंगेश कधीही घात करू शकतो.मंगेश तशाच स्वभावाचा माणूस असल्याने तिला लग्न पार पडेपर्यंत दक्षता घ्यावी लागली.लग्नानंतर इंदिरेला आज जरा उसंत मिळाली होती.ती डोळे मिटून आपल्या खोलीत निजली होती.मिटल्या डोळ्यासमोर तिच्या लग्नानंतरचे दिवस आठवले.म़गेश कधी बिथरेल याचा नेम नसायचा.एक दिवस मंगेश ऑफीसमध्ये गेल्यावर घरातील कामं आटोपल्यावर इंदिरा जरा