तिचा पिलामधी जीव, जीव झाडाले टांगला

  • 6.6k
  • 2k

पिल्लं निजली खोप्यात जसा झुलता बंगला!! तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला!!!बहिणाबाईंची ही रचना जरी पक्षिणीसाठी असली तरी ती आजच्या पिढीतील नोकरदार आईला तंतोतंत लागू पडते..खरचं , आपल्या लहान बाळाला पाळणाघरात किंवा स्वतःच्याच घरात दुसऱ्या व्यक्तीजवळ ठेऊन कामावर जाताना , त्या स्त्रीला काय वाटत असेल..आजकाल ही वेळ बहुतांश स्त्रियांवर येते कारण सध्याची चौकोनी वा त्रिकोणी कुटुंब पद्धती आणि त्यातही संसाराचा आर्थिक गाडा नीट चालण्यासाठी स्त्रीला घराबाहेर पडणं अपरिहार्य असणं...मागच्या पिढी मध्ये एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती, घरात माणसाची संख्या खुप होती, त्यामुळे त्या वेळच्या स्त्रियां जरी नोकरी करत असल्या तरी त्यांच्या मुलांची जबाबदारी त्यांचे संगोपन घरातील बाकीचे मंडळी करत असे.त्यामुळे