वाकडेवड - एक रोमांच भाग ४ बघतो तर काय! विहिरीत एका नग्न मुलगीचा मृतदेह पडला होता. अक्षरशः अंगावर एक सुद्धा कपडा न्हवता. केस सगळे सोडलेले होते. तो मृतदेह विहीरीच्या कडेला पायरीवर पडला होता. पानी हालेल तसं तिचे केस सुद्धा हालत होते. ते दृश्य फार भयावह होते. तो नग्न देह पहायला कसंतरी वाटत होतं. इतक्यात कोणीतरी आपल्या खांद्यावरचा टॉवेल काढला आणि पायऱ्या उतरून तिच्या अंगावर टाकला. तरीदेखील तिचा पूर्ण देह झाकला गेला न्हवता. गुडघ्यापासून खाली आणि पूर्ण हात तसेच उघडे होते. पाय आणि हात मी निरखून पाहिले. हातात पायात कोणताही दागिना दिसला नाही. शिवाय, अंगाला एखादा खोंबारा लागल्यावर जसे हलके ओरबडे