वाकडेवड - एक रोमांच - 3

  • 7.3k
  • 3.5k

वाकडेवड एक रोमांचभाग 3 गडबडीत फोन उचलला आणि टॉर्च पुन्हा शेताकडे पाडली. आणि पाहतो तर काय ! समोर एक पांढरं शुभ्र कुत्रं. असं कुत्रं मी जीवनात कधीच पाहिलं न्हवतं. अंगाने एकदम धिप्पाड, निळे डोळे, कंगव्याने केस विंचरले आहेत असे भासवणारे मुलायम केस. इंद्राचा शुभ्र ऐरावत जसा लख्ख उठून दिसला असता अगदी मला तसंच वाटत होतं. आपलं कसं असतं ना! एखाद्या गोष्टीचा अतिरेक जरी झाला तरी ती गोष्ट भयावह वाटू लागते. म्हणूनच एवढं देखणंपान कुत्रं पाहून देखील माझं अंग कापायला लागलं होतं. त्याची शेपूट कोल्ह्यासारखी फुगीर आणि लांबवली तर जमिनीला लोळेल एवढी मोठी होती. घोड्याचे मानेला जसे केस असतात तसे त्याचे