निर्णय भाग ११मागील भागावरून पुढे…इंदिरा आता एका वेगळ्या निश्चयाने मिहीरच्या लग्नाची तयारी करत होती. कालच लग्नाच्या पत्रिका छापून आल्या. गणपती आणि देवीला पत्रिका ठेऊन मग काही जवळच्या जेष्ठ नातेवाईकांना पत्रिका देऊन लग्नाची अक्षत द्यायला जायला हवं हे लक्षात घेऊन इंदिरा मंगेशला म्हणाली," ऊद्या शुभदिवस आहे. कालच लग्नाच्या पत्रिका छापून आल्या आहेत. ऊद्या आधी गणपती आणि देवीला पत्रिका देऊन मग जेष्ठ नातेवाईकांना पत्रिका आणि लग्नाची अक्षत द्यायला जायला हवं.त्यामुळे ऊद्या सकाळी साडेसात पावणे आठच्या सुमारास तयार रहा. बाबू ड्रायव्हरलापण सांगीतलं आहे."" माझा काय संबंध? लग्नाच्या पत्रिका तू द्यायला जा. मला यायची इच्छानाही.लग्नं तू ठरवलं." मंगेश तिरसटासारखा बोलला."तुमची इच्छा विचारत नाही तुम्हाला