ह्याला जीवन ऐसे नाव - भाग ३

  • 7.1k
  • 3.4k

भाग 3   भाग 2 वरून पुढे  वाचा ............   रात्री मॅडम जेवणाचं ताट घेऊन आल्या. “घे. जेवून घे.” म्हणाल्या. त्याच दिवशी रात्री अडीच तीन च्या सुमारास ४-५ लोक घरात घुसले. चाहूल लागून पंडित उठला. त्याला घेरून ४ लोक उभे होते. हातात लाठ्या होत्या. चांगलेच सराईत चोर वाटत होते. त्यांनी पंडितला काठीनेच दाबून धरलं होतं. “आवाज करेगा तो जान गँवाएगा” अस म्हणून एकाने भला मोठा सुरा काढला. पाचवा दार उघडण्याची खटपट करत होता. त्याच्याजवळ लोखंडी पहार होती. पंडितनी जरी चाळीशी ओलांडलेली असली तरी लेचापेचा नव्हता. तरुणपणी व्यायाम केलेलं शरीर होतं. त्यानी अंदाज घेतला आणि लाथ मारून सुरा घेतलेल्या चोराला पाडलं