ह्याला जीवन ऐसे नाव - भाग २

  • 7.3k
  • 3.4k

ह्याला जीवन ऐसे नाव भाग 2 भाग 1 वरुन  पुढे वाचा.   “कोण कोण आहेत बरोबर ?” पंडितनी विचारलं. “मी एकटाच. तुम्ही येता ?” पुरोहितचा प्रतिप्रश्न. “नाहीतरी मी भटकंती करायलाच निघालो आहे, तेंव्हा विचार करतोय की काय हरकत आहे पायी परिक्रमा करायला ? हा ही अनुभव घेऊन पाहावा.” पंडित म्हणाला. “अरे वा ! मग तर छानच होईल मला पण कंपनी मिळेल.” पुरोहित म्हणाला. त्याला आनंद झालेला दिसत होता. “बोलता, बोलता वाट कशी सरेल ते कळायचं पण नाही. परत अडचणीच्या काळात कोणी बरोबर आहे याचाच दिलासा असतो. विचार करा आणि सांगा.” जेवता जेवता बऱ्याच अवांतर गप्पा झाल्या, पंडितला पुरोहित एकदम आवडून