निर्णय - भाग १०

  • 8.3k
  • 4k

निर्णय भाग १०मागील भागावरून पुढे..मंगेशच्या या नवीन पावित्र्यामुळे इंदिराला फार संताप आला.माणसानी किती आपल्या अहंकाराला जपावं.पोटच्या मुलाचं लग्नात अश्या पद्धतीने खोडा टाकायचा.इंदीरानी मनाशी काहीतरी ठरवलं आणि ती बागेत आली. झाडाला आळं करता करता तिने शरदला फोन लावला. इंदीरेनं आपल्या कानात मुद्दाम हेडफोन घातला होता आणि तिचं सगळं लक्ष दाराकडे होतं. मंगेशचा काही भरवसा नाही कधीही तो आपलं बोलणं ऐकायला मागे येईल अशी शक्यता इंदीरेला वाटत होती म्हणून हा सावधपवित्रा इंदिरेने घेतला." हॅलो, वहिनी बोला.""शरद भाऊजी आज संध्याकाळी घरी आहात का?"" हो.काही काम आहे का?""आज यांनी वेगळाच गोंधळ घातलाय. म्हणून तुमच्याशी बोलायला यायचं होतं.""मंगेशनी गोंधळ घातला आहे.कमाल आहे मंगेशची. या वहिनी