निर्णय - भाग ८

  • 7.6k
  • 3.8k

निर्णय भाग ८मागील भागावरून पुढे…शुभांगी आणि तिच्या घरची मंडळी ठरलेल्या दिवशी इंदीरेच्या घरी आले.त्यावेळेस मिहीरपण होता. मेघना मात्र आली नाही कारण तिची असाईन्टमेंट पूर्ण करायची होती.इंदिरेचं मंगेशकर बारीक नजर होती.मिहीरला धाकधुक होतं होती.ती मंडळी स्टेशनवरून जशी निघाली शुभांगी ने मिहीरला फोन करून सांगितलं. तशी इंदीरा मंगेशला म्हणाली" मी जे काय सांगीतलं तुमच्या लक्षात आहे नं ?"मंगेश नी नुसतं इंदिरेकडे बघीतलं" मी काय विचारतेय?"" दहावेळेला तेच सांगायला नको मला "तुमच्यावर विश्वास नाही माझा""माझा पण तुझ्यावर विश्वास नाही.""तुम्ही कधी कोणावर विश्वास ठेवला आहे? माझ्यावर तरी कसा ठेवावा.""फार बोलू नकोस.मी शांत आहे तोपर्यंत ठीक आहे.""तुम्ही रागामध्ये कोणतंही वाकडं पाऊल उचललं तर मग मी