निर्णय - भाग ४

  • 9.6k
  • 4.9k

निर्णय भाग ४मागील भागावरून पुढे...मिहीर पाठोपाठ मेघनापण बंगलोरला गेली.दोघही एकाच फ्लॅटवर रहात होते. मेघनाचही काॅलेज साधारण आठवड्यांनी सुरू झालं की तिही मिहीर सारखीच बिझी होणार.दोघंही इंदीरेला फोन करत पण मंगेशशी कधी बोलत नसत. यामुळे मंगेशच्या अंगाचा तिळपापड होत असे." मुलांना बाप परका वाटतोय का? एवढे दिवस झाले आपण काय करतोय हे बापाला कळवावसं वाटतं नाही?"" मला माहित नाही." इंदीरा कपड्यांच्या घड्या करता करता म्हणाली." तुला कसं माहिती असणार! सांगीतलं तूच त्यांना.म्हणाली असशील बापाला कशाला कळवायला पाहिजे."इंदीरा अजीबात विचलीत न होता आपलं काम करत होती. तिच्या या वागण्यामुळे मंगेश इतका चिडला की त्याने सगळ्या घड्या केलेले कपडे उचलले आणि भिरकावून दिले."