निर्णय कादंबरी भाग४बंगलोरला पोचल्यावर जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा तो जे बोलला ते ऐकून इंदीरेला विचित्र वाटलं पण याला सर्वस्वी जबाबदार मंगेशच होता.मिहीर म्हणाला," आई बंगलोर स्टेशन वर उतरताच मला बाबांच्या कडक शिस्तीच्या जोखडातून मुक्त झालो याचा खूप आनंद झाला. आई कदाचित तुला माझं बोलणं. आवडणार नाही पण ही माझी भावना खरी आहे. तू कशी इतकी वर्ष त्यांचा हा जाच सहन करत आलीस."इंदिरा म्हणाली, "मिहीर तुझ्या आणि माझ्या भूमिकेत फरक आहे. मला तुझ्या सारखं वाटलं जरी असत तरी मी तसं वागू शकले नसते.तुम्हा दोघांचं आयुष्य माझ्यावर अवलंबून होतं. कोणताही विचार करण्यापूर्वी मल दहादा विचार करावा लागत असे. तू बाहेर पडावस