निर्णय - भाग १

  • 18.3k
  • 10k

निर्णय.भाग१ला"कशाचा एवढा माज आलाय तुला?" मंगेशनी चिडून विचारलं .इंदीरानी मात्र चेह-यावर काही भाव न दाखवता शांतपणे आपली बॅग भरायला सुरुवात केली. मंगेशनी रागानी तिचा हात पकडून पुन्हा तोच प्रश्न केला तेव्हा ती शांतपणे म्हणाली "मी निर्णय घेतला आहे. तो आता बदलणार नाही.""एक दिवस बाहेर राहीलीस की कळेल जगायला पैसा लागतो. तेव्हा माझ्याकडे येऊ नको हात पसरून. एक छदाम मिळणार नाही तुला. समजलं?" मंगेश जितक्या रागानी बोलत होता तेवढीच इंदीरा शांत होती. ती शांत आहे याचाच त्याला जास्त राग येऊ लागला. आत्तापर्यंत आपल्यासमोर थरथर कापणारी ही बाई आज कोणाच्या जीवावर एवढी धीट झाली आहे हे त्याला कळत नव्हतं.ते कळत नव्हतं म्हणून