अकल्पित - भाग ३

  • 8.3k
  • 3.8k

अकल्पित   भाग   ३ भाग २  वरुन  पुढे वाचा ........   “हॅलो साहेब मी PSI धनशेखर बोलतो आहे. एक मुलगा परेश मेहता, तीन दिवसांपूर्वी  हरवला आहे, तुम्हाला अपडेट दिलं होतं काल, त्यांचे where abouts मिळाले आहेत. सूरत च्या आसपास त्यांची लोकेशन मिळाली आहे. सूरत च्या पोलिसांना कळवून त्यांची मदत घ्यावी लागणार आहे साहेब.” “खबर पक्की आहे?” – साहेब. “हो साहेब.” – धनशेखर.   “मग तातडीने हालचाल करा. सूरत पोलिसांशी बोला आणि तुम्ही पण लगेच सूरतला निघा.” – साहेब.   “होय साहेब. आज रात्रीच निघतो.” – धनशेखर.   “ओके. मला अपडेट देत रहा.” – साहेब.   “ओके साहेब.” – धनशेखर म्हणाले, आणि