अकल्पित - भाग २

  • 8.6k
  • 4.1k

  अकल्पित   भाग   २ भाग १ वरुन  पुढे वाचा ........   सचिन वैतागला त्याला कळेना, की बाबा असे का वागताहेत, म्हणाला. “बाबा अहो तुम्ही काय बोलता आहात ते तुम्हाला तरी कळलय का ?” “नाही, मलाही कळत नाहीये, पण थांब, माझ्या डोक्यात काहीतरी घडतंय. जरा थांब.” रामभाऊ म्हणाले.  हॉल मध्ये विचित्र शांतता पसरली, नर्मदा रडायचं थांबली. सगळेच रामभाऊंकडे पाहू लागले. पांच मिनिटांनी रामभाऊ त्रिलोकच्या मुलीकडे बघून म्हणाले “वैशाली बेटा मला एक कागद, आणि पेन देशील” वैशालीने कागद आणि पेन आणून दिला. रामभाऊंनी त्यावर एक मोठा  गोल आणि त्यांच्या आत एक छोटा गोल काढला. छोट्या गोलात त्यांनी लातूर अस लिहिलं. मोठ्या गोलात