सुन्या... सुन्या मैफिलीत माझ्या..

  • 10.9k
  • 1
  • 2.8k

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…एक दिवस विद्या आपल्याच विचारात असताना तिच्या मोठया भावाने मुकूंदने बघीतले तो लगेच तिला म्हणाला,"विद्या किती दिवस त्या अरूणचा विचार करून आपल्या आयूष्यातील एकेक दिवस गमावणार आहे? स्वत:कडे बघ जरा."मुकूंद लहान बहीण विद्याच्या प्रेमापोटीच बोलत होता. यावर विद्या हसून म्हणाली,"अरे माझ्या मनात आत्ता अरूण नाही. आत्ता मी फक्त माझाच विचार करतेय."" मला पटलं नाही." मुकूंद म्हणाला. जरा थांबून पुढे म्हणाला," असं आहे तर तू लग्नाला सतत नकार का देतेस?""अरे दादा आता मला लग्नाबद्दल एवढं आकर्षणच वाटत नाही मग कशाला ते लग्न नावाचं जोखड माझ्या गळ्यात बांधून घेऊ?"मुकूंदाला तिचं म्हणणं काही पटलं नाही.तो पुढे काही न बोलता निघून