साक्षीदार - 18

  • 7.1k
  • 3.2k

प्रकरण १८ लोटलीकर हा एक सडपातळ शरीरयष्टीचा आणि निराश चेहेरा असलेला इसम होता.आपले डोळे सारखे मिचकावण्याची आणि जिभेने ओठ ओले करण्याची त्याला सवय होती.घरातच एका लोखंडी पेटीवर तो बसला होता. कनक कडे बघून त्याने नकारार्थी मान हलवली . “ तुम्ही, चुकीच्या माणसाकडे आलाय.माझं लग्न झालं नाहीये.” “ सुषुप्ती वायकर नावाच्या मुलीला ओळखतोस?” –कनक “ नाही.” आपली जीभ ओठावर फिरवत तो म्हणाला. “ तू घर सोडून चाललायस हे?” घरातल्या सामानाकडे बघत कनक ने विचारलं. “ हो. मला भाडं परवडत नाही याच.” “ कुठे जाणारेस रहायला?”-कनक “ अजून नक्की केलं नाही. कमी भाड्याची खोली बघीन एखादी.” दोघांनी पुढे काही न विचारता त्याच्याकडे