पेरजागढ- एक रहस्य.... - ३२

  • 7.4k
  • 3k

३२. पवनच्या वडिलांचे मनोगत... जवळपास तीस वर्षे होतात या गोष्टीला.माझं लग्न होऊन चार ते पाच वर्षे झाली तरी आम्हाला संतान प्राप्तीचे सुख नव्हते.मी एक प्राध्यापक असलो तरी त्या सुखाकरिता कित्येक अंधश्रद्धाचं, मी त्या वेळेस खतपाणी घालून पालन केलं होतं.कित्येक उपास तपास पोटाला आळी मारेपर्यंत घालवले होते.कित्येक देव्हारे अंगठे झिजेपर्यंत तुडवले होते.पण हातात निराशेचे कौल घेऊन परतल्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नव्हतं.त्यावेळेस देव देवळे,पूजा अर्चना,वैद्य नैवैद्य या सगळ्यांशी मी त्रासून गेलो होतो.जगाला दाखवण्यासाठी आम्ही सुखी तर होतोच पण समाधान नव्हतेच आम्हांत. हिंडता फिरता जेव्हा आम्ही इथे स्थायिक झालो तेव्हा बऱ्याच डॉक्टरची ट्रीटमेंट चालू होती.अशाच एका ट्रीटमेंटला जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यावेळेसची ही घटना