स्नेही - 2

  • 6.5k
  • 2.9k

प्रियाच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच आई बाबा रूम मधे येतात आई:- काय झालं ग ओरडायला. बरी आहेस न तू.बाबा :- काय झालं बाळा. प्रिया कधी आई बाबा कडे कधी लॅपटॉप कडे डोळे वटारत बघत असते.प्रिया:- रिझल्ट लागलाआई:- मग काय दिवे लावले बाई (आई हसतच बोलते कारण प्रिया हुशार मुलगी. कायम पहिली येणारी प्रिया जरी मस्तीखोर, प्रत्येकाची खेचत असणारी असली तरी वेळेवर कायम सर्वांना पहिली येऊन धक्का देत असे) प्रिया :- (डोळ्यात पाणी आणत) आई 89% पडले मला ग. मला 90% च्या पुढे हवे होते ना आई :- अग बाई खुप चांगले आहेत की ग. बाबा:- अभिनंदन प्रियु. रडतेस का !