'आसं मज बाळाची भाग ३मागील भागावरून पुढे...वैभवनी उत्तरादाखल फक्त हं असा हुंकार दिला.कारण इथे अनघाला वैभवन काही बोलावं हे अपेक्षितच नव्हतं. अनघाला फक्त ही गोष्ट त्याला सांगायची होती. वैभव हे जाणून होता म्हणून डोळे मिटून बसला होता.आज दहा वर्षं झाली वैभव अनघाला ओळखत होता. तिच्या स्वभावानुसार आपण कधी उत्तर द्यायचं कधी फक्त हुंकारच द्यायचा हे तो जाणून होता. म्हणूनच आत्ता तो काही बोलला नाही. तसाही खूप दु:खाच्या प्रसंगात कोणालाच चर्चा आवडत नाही तर स्पर्शातून, चेह-यावरून, डोळ्यातून सांत्वना हवी असते.दु:ख झेलणाराच बोलत असतो. त्यालाच बोलू द्यावं.आपण फक्त श्रोत्याची भूमिका करावी. बोलणारा भडभडून बोलतो आणि तणावमुक्त होतो. हे त्यानी कुठंतरी वाचलं होतं.