कंस मज बाळाची - भाग २

  • 7.7k
  • 3.9k

वैभव हळूच उठला आणि फोन घ्यायला दुस-या खोलीत गेला. त्याची चाल अगदी गळून गेल्यासारखी दिसत होती.मेहतांचा दवाखाना नेहमीच गर्दीने गजबजलेला असायचा. त्यांच्या हाताला यश होतं. म्हणून बाळाच्या ओढीनी पेशंटला त्यांच्या दवाखान्यापर्यंत खेचून आणत असेल. त्यांच्याबद्दल वैभवला त्याच्या मित्रानी सांगीतल होतं म्हणूनच ती दोघं कालचे रिपोर्ट घेऊन त्यांच्याकडे आले होते. आपल्या नावाचा पुकारा होईपर्यंत बसल्या बसल्या तिथे आलेल्या प्रेग्नंट बायकांच्या पोटाचं अनघा निरीक्षण करत होती. प्रत्येकीच्या पोटाचा आकार वेगवेगळा होता. कोणी सोफ्यावर सहजपणे बसली होती तर कोणाला बसणं अवघड जात होतं तरी पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. हे सगळं आपल्या आयुष्यात घडावं असं वाटत असतानाच हा खेळ सुरू झाला होता.