कंस मज बाळाची - भाग १

  • 10.4k
  • 5.7k

आसं मज बाळाची ... भाग पहिला.काल अनघा खूप आनंदात होती कारण जवळपास दीड महिना पाळी न आल्याने तिला यावेळी तरी नक्कीच गोड बातमी असेल याची खात्री वाटत होती. म्हणूनच तिने प्रेग्नेंट प्रेग्नेंसी टेस्ट केली होती. त्याचा रिपोर्ट येईपर्यंत मनातल्या मनात तिने स्वतःचं बाळंतपण झालेलं सुद्धा बघितलं होतं. एका छोटसं गोंडस बाळ आपल्या कुशीत पहुडलं आहे असं बघितलं.थोड्यावेळानी वास्तव लक्षात येताच ती खुदकन स्वत:शीच हसली.खरंच मनाबद्दल म्हणतात ते काही खोटं नाही मन कसं असतं कुठल्याही काळात जाऊन विहार करु शकतं. मनाच्या शक्तीमुळेच तर आपण जिवंत राहतो. मनाला मुक्तपणे विहार करायला जगाचा कोणताही कोपरा चालतो. पण या सगळ्या गोष्टी कालच्या होत्या आज