साक्षीदार - 17

  • 6.8k
  • 3.2k

प्रकरण १७ कनक ओजस च्या ऑफिसात दोघे बसले होते. “ पाणिनी, मानलं तुला, फार मस्त डाव टाकलास.तू तर सुटलासच आणि खुनी अशिला कडून लेखी जबाब घेण्यात ही यशस्वी झालास ! तू नेहेमी अशील निवडताना तो निर्दोष असल्याची खात्री असेल तरच निवडतोस पण पहिल्यांदाच तुझ्या अशिलाने तुला दगा दिला पाणिनी.” कनक म्हणाला. “ पण मला सांग पाणिनी, तुला अंदाज होता, काय झालं असावं याचा?” “ मला होता अंदाज, पण अंदाज असणं आणि पुरावा मिळवणं या वेगळ्या गोष्टी आहेत. पण आता मात्र तिला वाचवायचं आव्हान आहे समोर.” शून्यात पहात पाणिनी पुटपुटला. “ विसरून जा ते आता. पाहिली गोष्ट म्हणजे ती त्या लायकीची