तांडव 4 मी पंढरीला फोन केला .तो रिकामा होता.मी त्याला घेवून धरणावर गेलो. एकमेकांना टेकलेल्या दोन त्रिकोणी टेकड्यांना समोरून बांध घालून धरण बनवले होते. आजूबाजूला ऊसाची लागवड केलेली दिसत होती. परीसर छान दिसत होता. " पंढरी ..इथे शांत वाटतय...पर्यटक येत असतील नाही?" " येतात साहेब...पण ..कधीकधी.." " इथे फार्महाऊसही आहेत. मेजर दळवींचही फार्महाऊस इथे आहे ना?" " तूम्हाला कस माहित? " त्याने दचकून विचारले. " मेजर म्हणत होते की ते नसतात तेव्हा तूम्हाला तिथ ठेवतात...सहा महिन्यांपूर्वी तूम्ही तिथे होता...त्यावेळी सात तरूण आलेले...बरोबर ना?" पंढरी घाबरला. " साहेब...हे मेजरना सांगू नका..मी त्यांना नाही म्हणत होतो पण त्यांनी मला दोन तासांचे एक