रक्तकांड - 5 - अंतिम भाग

  • 7.1k
  • 3.4k

प्रकरण- ५ स्मिता रुपेशची अगदी जवळची मैत्रीण होती. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. स्मिता सोडून गेल्यावर रुपेश एकदम तुटून गेला होता. खूप दुःखी झाला होता. स्मिताला विसरण्याचा प्रयत्न करूनही तो तिला शेवटपर्यंत विसरू शकला नव्हता. त्याचे मन त्याला आतून खात होते कि मी उगाचच वैशालीच्या जागी स्मिताला स्पर्धेत भाग घ्यायला लावले. स्मिता नको नको म्हणत असताना सुद्धा मी तिला जबरदस्ती केली होती. मी माझ्या स्वार्थासाठी विनाकारण तिचा बळी घेतल्यासारखे झाले. रूपाची हार करण्यासाठी मी स्मिताचा वापर केला. मी स्मिताला मारले आहे---या विचाराने रुपेशची मानसिक स्थिती फार बिघडत चालली होती. शेवटी रुपेशलाही मानसिक उपचाराची मदत घ्यायला लागली. त्याला या स्मिताच्या विरहाच्या धक्क्यातून