रक्तकांड - 4

  • 7.2k
  • 3.8k

प्रकरण- ४ ब्युटीक्वीन स्पर्धेचा दिवस जवळ जवळ येत होता. परंतु दोन-दिवस झाले तरी वैशाली कॉलेजला आलेली दिसत नव्हती. वैशालीची स्पर्धेसाठी बरीच जोरात तयारी चालू आहे असे दिसते असे समजून रूपाने वैशालीला फोन लावला. " हा बोल रूपा---मला वाटलेच होते कि तुझा फोन येणारच---आत्ताच स्मिता, साधना,व वंदना यांचा फोन येऊन गेला---बोल काय म्हणतेस---? " "अगं, काय म्हणतेस काय---? दोन-तीन दिवस कॉलेजला आलीस नाही तर आम्हाला काळजी नाही का वाटणार---? तब्येत वगैरे बरी आहे नं---? " रूपा म्हणाली. " अगं हो, माझी सध्या तब्येत बरोबर नाही. ताप येतोय---डॉक्टरांकडे जाऊन आले. ब्लड टेस्ट केली तर टायफाईड आहे असे समजले. त्यामुळे खूप विकनेस आहे.