रक्तकांड - 3

  • 7.2k
  • 3.8k

प्रकरण-३ रूपा कॉलेजला सुट्टी असल्याने सोफ्यावर बसून टी.व्ही. बघत होती. परंतु रूपाचे मन टी.व्ही. बघण्यात लागत नव्हते. म्हणून चॅनल वर चॅनल फिरवत बसली होती. तिचे मन काही स्थिर रहात नव्हते. मनात असंख्य विचार घुमत होते. या वैशालीपुढे आपला टिकाव लागतो कि नाही.या गोष्टीचे तिला खूप टेन्शन आले होते.परंतु आपण काही झाले तरी माघार घ्यायची नाही. काय करू म्हणजे मी वैशालीला हरवू शकते---? हे मोठे प्रश्न चिन्ह रुपाला पडले होते. विचारामध्ये रूपाची बोटं टी.व्ही. रिमोटवर फिरत होती आणि एक एक चॅनल पुढे मागे सरकत होते. परंतु रूपाचे मन एकही चॅनलवर स्थिर होत नव्हते. " अगं रूपा, तुला टी.व्ही. जर बघायचा नाही