तांडव - भाग 3

  • 6.7k
  • 2.8k

तांडव भाग 3 एक कार वेगाने तळगावची घाटी ओलाडंत होती.एक पंचविस वर्षाचा तरूण ती गाडी चालवत होता.तो भारावल्या सारखा दिसत होता.यंत्रवत तो गाडी चालवत होता.हेडलाईटच्या प्रकाश झोतात रस्त्याच्या कडेला कुणीतरी उभे असलेले त्याला दिसले.थोड जवळ जाताच त्याच्या लक्षात आल की ती एक तरूणी आहे.ती गाडीला हात दाखवत थोडी पुढे आली.अभावितपणे तरूणाने ब्रेक दाबले. जांभळ्या रंगाची साडी...जांभळा ब्लाउज...खांद्याला जांभळी पर्स...दोन धनुष्याकृती भुवयांमध्ये गोलाकार जांभळ कुंकू .. पायात जांभळ्या रंगाच्या चपला......चेहर्यावर मोहक हसू व डोळ्यात मधाळ मोहिनी असा तिचा वेष होता. वेळ होती रात्री दोन वाजून दोन मिनीटांची ! हे काहीतरी वेगळ आहे ...हे कुणाच्याही लक्षात आल असत पण त्या तरुणांचा मेंदू