भाग - ०१. "बस क्रमांक अठरा, शाहूपुरी मार्गे!" ही सूचना कानावर पडताच सर्व प्रवासी जागेवरून उठले आणि सर्वांच्या नजरा बसच्या दिशेने खिळल्या! काहीच वेळात गर्द निळ्या रंगाची एक बस, स्थानकाआत शिरली. एकामागे-एक प्रवासी बाहेर पडले आणि बाहेर उभे असलेल्यांनी एकमेकांना धक्का देत स्वतःसाठी जागा बनवली. दहा मिनिटे बस तिथे थांबून राहिली आणि ११ वाजून ५ मिनिटांनी घंटीचा आवाज कानावर पडताच चालकाने पायाचा दाब वाढवत बस सुरु केली. काहीच अंतरावर जाऊन मोठा ब्रेक बसला आणि सर्व प्रवासी पुढे ढकलले गेले. सर्वांनी उठून चालकास सुनवायला सुरूवात केली. "काय हा मूर्खपणा?" "अरे आमची लहान मुलं आहेत; जरा तरी सांभाळून थोडं!" "क्या ये भाई,