खोकलीमाय एक गाव.....त्याला नव्हत नाव.....डोंगराच्या कुशीत वसलेल....नदीकाठी विसावलेले. हिरवी शेती त्यात भिरभिरणारे पोपटी रावे..ठायीठायी डोलणारी रानफुले... फुलांवर बागडणारी इवलीशी फुलपाखरे. शेतात राबणारे शेतकरी...कष्टकरी...सारे सुखी समाधानी होते. गावात धन-धान्याचा मुबलक साठा होता.सणासुदीला गावात आनंदाला उधाण यायच.भजन पूजन यात लोक दंग व्हायचे.मुल खेळात रंगलेली असायची. पण काळ फिरला.चोरपावलांनी खोकला गावात शिरला.घराघरात खोकण्याचा आवाज ऐकू येवू लागला. शिरपा ....सदा...रखमा...शांती..सारेच खोकू लागले.बघता-बघता सारा गाव खोकल्याने बेजार झाला.वैदू,मांत्रिक,तांत्रिक...नवस...सारे उपाय करून झाले पण खोकला थांबायचे नाव घेईना.खोकून ..खोकून..छाती सपाट झाली.हाड वाजू लागली. रात्री तर खोकल्याची जोराची उबळ यायची.झोप नाही...जीवाला थार नाही. डोळे जागरणाने लालेलाल झालेले.तोंडाची चव गेली..गंध गेला. घश्याखाली अन्न उतरेना.कूणी कुणाला मदत करायची? सारेच खोकल्याच्या