अगा जे घडलेचि आहे! - 1

  • 7.3k
  • 3k

१ आमच्या घरच्या हॉलमधला टीव्ही.. त्याच्यावर एक हिंदी सिनेमा सुरू. माझी छोटी माझ्या मांडीवर बसून पाहतेय.. एकाएकी म्हणाली, "बाबा, हे हिंदी सिनेमावाले काय पण दाखवतात. असे कधी होते काय? मी मोठी झालीय आता.. मला म्हायती सगळे खोटेखोटे आहे ते!" मुलीचे वय वर्ष पाच! घरातलेच कुणी मागे म्हणालेले ती परत पोपटपंची केल्यासारखे बोलतेय! पण खरे सांगतो हिंदी सिनेमा नाहक बदनाम झालाय! असे कधी होते का? असे म्हणजे कसे? कसे ही असो.. होते! म्हणजे होऊ शकते! नाही विश्वास बसत? मग वाचा हे.. खरेतर 'खरीखुरी' सत्यकथा! कोण म्हणतो सिनेमातल्या गोष्टी सत्यात येत नाहीत म्हणून? खरेतर प्रत्यक्ष आयुष्यात सिनेमाहूनही गंमतीदार गोष्टी घडतात.. घडू शकतात.