३०. रितूची आणि मृत्युदेवाची गाठ.... इकडे आचार्य निघून गेल्यावर हॉस्पिटलमध्ये रितू एकटीच माझ्यापाशी बसली होती.आचार्यांना बघून तिच्यात एक तरतरी आली असल्याची, खूण मात्र तिच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होती.आता लवकरच आणि निश्चितच काहीतरी मार्ग निघणार असे वारंवार तिला वाटत होते.खिडकीतून येणाऱ्या मंजुळ हवेचे चेहऱ्यावर झोत घेत ती बेडपाशी आली.जवळ असूनसुद्धा पुन्हा नव्याने ती माझ्या शरीराकडे बघत होती.कधी श्वास घेताना सुई...असा आवाज आला की डोळे एकवटून चेहऱ्याकडे बघायची.कदाचित मी डोळे उघडणार हा भास मनी घेऊन. इतक्यात दंडावरच्या ताईताने माझ्यावरचा यमराज घालवला होता.त्यामुळे शरीरावर बराच फरक जाणवत होता.शरीरावर पडलेल्या बऱ्याच वळांना उभारतांना बघून रितू थोडीफार निश्चिंत झाली होती.हळूच तिने ओढणीचा चंबू घेऊन माझ्या