तांडव - भाग 2

  • 6.3k
  • 2.8k

तांडव - भाग-2 तळगांव हे एक छोट गाव होत. गावात एकूण दोनच लाॅज होती.त्यातल्या त्यात एका बऱ्या लाॅजमध्ये मी एक रूम बुक केली. माझी बॅग मी रूममध्ये ठेवली पण बॅगेला दोन कुलपं लावून बॅग काॅटखाली ठेवली.हातपाय धुवून विश्रांती घेण्यासाठी मी बेडवर कंलडलो.मनात मी घडलेल्या घटनांची उजळणी करत होतो. मी पंढरी रंगसूरला फोन लावला.ते त्या बांधकामाच्या ठिकाणी होते.मला त्यांनी तिथेच भेटायला बोलावलं.मी उतरलेल्या लाॅजकडून ती जागा पाच मिनिटांच्या अंतरावर होती.मी रूम बंद करून चावी देण्यासाठी काउंटरवर गेलो. काउंटरवर पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा होता.मी सहज त्याला विचारले" सहा महिन्यांपूर्वी ज्या घराला आग लागलेली ते घर नेमकं कुठे आहे.?" "जवळच आहे, मेन रोडला लागूनच