साक्षीदार - 15

  • 6.7k
  • 3.3k

प्रकरण १५ पाणिनी ने अंदाज केल्या प्रमाणे पोलिसांनी ईशा अरोरा ला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि लगेचच वर्तमान पत्रात बातम्या आणि फोटो छापून आले. खुनात प्रेम प्रकरण असल्याचा संशय. खून झालेल्या माणसाचा भाचा आणि मोलकरणीची मुलगी यांचा साखरपुडा मयताच्या विधवा पत्नीचं मृत्यू पत्र खोटे असल्याचा आरोप. बंदुकीच्या मालका पर्यंत पोलिसांची पोच. अनावधानाने बोलून गेलेल्या वाक्याच्या आधारे खुनाच्या वेळी हजर असलेल्या वकिलाच्या शोधात पोलीस.आतल्या पानात आणखी बातम्या होत्या पोलीस स्टेशन मधे विधवा पत्नी ला अश्रू अनावर असा मथळा होता.बातमी वाचता वाचता पाणिनी च्या लक्षात आलं की पोलीस मधुदीप माथूर पर्यंत पोचलेत. परंतू गोळीबार झाल्यानंतर तो गूढ रित्या गायब झालाय.असं असलं तरी गुन्हा