हिरवे नाते - 1

  • 13.2k
  • 7.1k

गणेशा समोर कंदी पेढे ठेऊन मनोभावे नमस्कार करत अपर्णाने श्रद्धेने डोळे मिटले. आज पायलचा बारावीचा रिझल्ट लागला होता. बोर्डातून पहिली येण्याचा मान तिला मिळाला होता. गोल्ड मेडलची ती मानकरी ठरली होती . डोळे उघडून निरांजनाच्या प्रकाशाने भारलेल्या आणि जाईच्या सुवासाने तृप्त झालेल्या गणेशाकडे तिने नजर टाकली, चांदीच्या वाटीत एक पेढा ठेवून बाकी पेढे वाटण्यासाठी हॉलमध्ये आली. तिथे उत्साहाला उधाण आले होते. क्षणभर तिला आपण पिक्चर पहातोय असच वाटू लागलं . सासू सासरे, कौतुकाने निथळत्या नजरेने पायलकडे बघत होते. वडील अभिमानाने लेकीला न्याहाळत होते. आरव आपल्या मोठ्या बहिणीच्या यशाने फुलून आला होता. मित्र मैत्रिणींंच्या गराड्यात बसलेल्या पायलशी सगळेच एकदम बोलत होते