पेरजागढ- एक रहस्य.... - २९

  • 6.1k
  • 2.6k

२९.सात बहिणींचे अगोदरचे वास्तव्य.... पेरजागडापासून काही अंतरावरच नवतळा नावाचे एक छोटेसे गाव होते.ज्यात माना जमातीचे एक कुटुंब वास्तव्य करत असे.मोलमजुरी करणे आणि पोट भरणे हेच त्यांचं उदरनिर्वाहाचे साधन होतं.मुलाच्या हव्यासापोटी एका पाठोपाठ एक अशा सात मुली त्यांना जन्मास आल्या.आधीच्या युगात असं होतं की वारसान जपायला मुलांचं महत्त्व तितकंच जपलं जायचं. ज्याचं बळी कित्येकदा मुलगी किंवा तिची आई व्हायची.त्यामुळे समाजात काय रूप दाखवणार? जेव्हा माझा वारस नसणार, ही चिंता त्याला सतावू लागली होती. काबाडकष्ट करायला दोन हात असायचे.आणि खायला आठ तोंड.त्यामुळे अन्नाविषयी आणि कपड्याविषयी नेहमीच घरात रडारड चालायची.त्यामुळे कुणाला काय करावे? काहीच सुचत नव्हते.अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी वादविवाद वाढायचे.बऱ्याच वेळा असं