अस्वस्थ

  • 7.5k
  • 2.8k

बेचैन होऊन सुधाने शेवटी गार्गीला हटकलेच, अगं थोडी बाजूला बैस न, किती चिकटून ? उन्हाळा आहे त्यात आपण नागपूरहून निघालो आहे गडचिरोलीला जायला . कोणास ठाऊक तिथे चांगलं हॉटेल असेल कि नाही काय ह्या कंपनीला म्हणावं कशाला त्या गडचिरोलीच्या बँकेचे ऑडीट घेतात कुणाला ठाऊक आणि त्यात आम्हा बायकांना पाठवतात. अगं होणं बाजूला किती बोलावं लागणार तुला हो ग , किती चिडतेस? गार्गी तेवढीच बेफिकीर होती ती सुधाच्या मांडीला चिकटून बसली होती हे बघ ह्या गर्मीने माझा जीव वैतागलंय आणि तू बेफिकीर आहेस - सुधाचा आवाज अजूनही तणतणलेला होता मग कशाला हे एवढं सलवार कुर्ती आणि त्यावर हा दुप्पटा घातलास ?