साक्षीदार - 13

  • 6.3k
  • 3.4k

साक्षीदार प्रकरण १३ चक्रवर्ती हॉटेल च्या रूम नंबर ९४६ च्या बाहेर पाणिनी पटवर्धन क्षणभर उभा राहिला आणि बेल वाजवली. आतून एका तरुणीचा आवाज आला, “ कोण आहे?” “ कुरियर” पाणिनी म्हणाला तिने दार उघडताच पाणिनी आत घुसला आणि दार लावून घेतलं. तिच्या डोळ्यावरची झोप उडाली नव्हती अजून. “ काय आगाऊ पण आहे हा?, एकदम आत काय घुसलात?” “ मला बोलायचं आहे तुझ्याशी.” “ कोण आहात कोण तुम्ही? कुरियर वाला नक्कीच नाही. पोलीस? गुप्त हेर?” “ पटवर्धन.वकील आहे मी.” “ बर मग?” “ मी ईशा अरोरा चा वकील आहे. काही संदर्भ लागतोय?” पाणिनी म्हणाला . “ मुळीच नाही.” “ फिरोज लोकवाला