स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 2

  • 16.1k
  • 1
  • 10.8k

मीराच्या समोर असणाऱ्या त्या मुलीने आवाज कुठून आला म्हणून मीराच्या मागे डोक थोड वर करुन पाहिलं आणि त्याच क्षणी त्यानेदेखील तीच्याकडे पाहिलं....तेच डोळे.... तोच चेहरा.... तो तिच्याकडेच पाहत राहिला.... जणू त्याला धक्का बसला होता आणि ती ही त्याच्याकडे पाहत होती.... पण तिच्या डोळ्यात ती शॉक झाली आहे असे कुठलेच भाव नव्हते पण काहीतरी होत पण काय होत ते......??तो आपला किती तरी वेळ तिलाच पाहत होता.. पण पहीले जे भाव होते ते आता नाहीसे झाले होतेत्याच्या चेहऱ्यावरून....निर्विकारपणे तो तिला पाहत होता....त्या मुलीची नजर पुन्हा मीरा वर येऊन थांबली...जी तिला टकमक पाहत होती." मीरा लेट्स गो, उशीर होईल आपल्याला दुसरीकडे पण जायच