जास्वंदी

  • 22.4k
  • 1
  • 7.4k

जास्वंदी नारायण नावाचा एक लाकुडतोड्या होता. पहाटे तो जंगलात जायचा शोधून वाळलेली लाकडे तोडायचा त्यांच्या मोळ्या बांधून विकायचा. मिळालेल्या पैशात तो आणि त्याची बायको इंद्रायणी आनंदाने राहायची. त्यांना राजस नावाचा एक मुलगा होता.एकदा नारायण जंगलात गेला. वाळलेले लाकड तोडू लागला.तो आपल्या कामात मग्न होता. " बाबा , जरा जपून. मला लागेल." नारायण घाबरला.कोण बोलतोय? आसरा, हडळ की आणखी कोण? " बाबा, घाबरू नका. मी इथे आहे.मला बाहेर काढा." नारायणाने इकडे तिकडे बघितल...आवाज बाजूच्या जास्वंदीच्या झुडपातून येत होता.तो तिथे गेला. जास्वंदीच्या लालभडक फुलांमध्ये एक गोरीपान छोटी मुलगी हसत होती.नारायण चकित झाला.या जंगलात ही सुंदर मुलगी कुठून आली? ती बोलू कशी शकते?