आकाशी झेप घे रे पाखरा !! - भाग ३

  • 6.1k
  • 2.6k

माझ्यातील स्त्री हार मानायला तयार नव्हती.अर्णवचा विचार मनात येऊन आपण करतोय ते योग्य आहे ना असं किती तरी वेळा माझ्या मनात आलं पण आता जर ठाम निर्णय घेतला नाही तर परत कधीच हे शक्य होणार नाही हे मला पटलं.. मनातल्या मनात याविषयी बरीच द्वंद झाली आणि शेवटी घटस्फोट घेण्याच्या निर्णयास आले.."आता तुम्हीच सांगा.. काय चुकलं माझं.."मी फक्त हसून तिच्या पाठीवर हात ठेवला.. तिला धीर दिला पण ती चूक की बरोबर यावर त्या क्षणाला भाष्य टाळले..एकदा श्रीकांतलाही भेटून त्यांची बाजू ऐकायची मनात ठरवलं.तशी संधी मला लवकरचं मिळाली.. एक दिवस त्याचाच फोन आला.." तब्बेत बरी नाही. याल का घरी"..घरी गेले तर त्याचं